- सन २०२४/२५-
' क ' वर्ग दर्जा प्राप्त
सध्या गावातील ज्योतिर्लिंग देवालय व इतर धार्मिक स्थळांना सन २०२४/२५ मध्ये क वर्ग दर्जा प्राप्त झालेला आहे. ही गावासाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे.
सध्या गावातील ज्योतिर्लिंग देवालय व इतर धार्मिक स्थळांना सन २०२४/२५ मध्ये क वर्ग दर्जा प्राप्त झालेला आहे. ही गावासाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे.
मौजे दोनवडे गावाची ऐतिहासिक ओळख असलेल्या वडाच्या झाडाचे संवर्धन ग्रामपंचायती कडून करण्यात आलेले आहे
भुतगल्ली मधील महादेव तालमीच्या वरती असलेल्या व्यायामशाळेचे नविन मशिनरी सहीत नूतनीकरण केले
ग्रामपंचायत दोनवडे वेब पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे, कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील ‘दोनवडे’ हे गाव. पुरातन काळापासून ग्रामीण संस्कृती जपलेले गांव आहे. कोल्हापुर शहरापासून अगदी जवळ असूनसुद्धा एकोप्याने राहणारे, राजकीय, सहकार तसेच क्रिडाक्षेत्रात आपले नाव सतत उल्लेखनीय कामगिरीमुळे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यात देखील नावाजले जाते.
दोनवडे
राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्यात आपले नाव नावाजले जाते.
आतापर्यंत कुंभीं कासारी साखर कारखाना, करवीर पंचायत समिती, रयत कृषी संघ, इरिगेशनचे फेडरेशन आदी तालुका पातळीवरील संस्था मध्ये गावाने आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवला आहे.
दोनवडे
सहकारात सतत उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्यात आपले नाव नावाजले जाते.
फड पद्धती पासुन सुरू झालेला गावातील सहकारी संस्थांच्या विस्ताराचा आता वटवृक्ष झाला आहे. सध्या दोन दूध संस्था, दोन कृषी सेवा संस्था, दोन पाणीपुरवठा संस्था या माध्यमातून गावात सहकाराचा पाया मजबुत आहे.
दोनवडे
क्रिडाक्षेत्रात सतत उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्यात आपले नाव नावाजले जाते.
कुस्तीमध्ये तालुका,जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर गावातील अनेक मल्लांनी नावलौकीक मिळवला आहे. नेमबाजी, हॉकी जलतरण आदी क्रीडा प्रकारातही गावातील खेळाडूंनी लक्षवेधी कामगिरी केली आहे.
सतत उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्यात आपले नाव नावाजले जाते.
पुरातन काळापासून ग्रामीण संस्कृती जपलेले गांव आहे. कोल्हापुर शहरापासून अगदी जवळ असूनसुद्धा एकोप्याने राहणारे, राजकीय, सहकार तसेच क्रिडाक्षेत्रात आपले नाव सतत उल्लेखनीय कामगिरीमुळे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यात देखील नावाजले जाते.








































सन २०११ च्या जनगणनेनुसार
माननिय लोकनियुक्त
ग्रामपंचायत दोनवडे
कार्यकाल – सन २०२३ ते २०२८
आपला भारत देश आंतरराष्ट्रीय पातळीवर तरुणांची संख्या जास्त असलेला देश म्हणून ओळखला जातो, तशी वृद्ध मंडळीही आपला इतिहास सांगतांना म्हणतात, की या ‘दोनवडे’ गावात राहणारे वंशज हे मुंगीपैठण येथील देशमुख-पाटील घराण्यातील आहेत. पुरातन काळी त्यांच्या वंशजांनी मुंगीपैठण येथे त्यांच्याकडील हत्ती मारला व त्याच्याबरोबर वाद झाल्याने आणि त्यामुळे त्यांना गांव सोडावे लागला. हे सर्व लोक मजल दरमजल करीत त्यापैकी काही लोक भोगावती नदीकाठी स्थिरावले व त्यांनी आपली वस्ती उभारली. पुरातन कांही गावे, शहरे ही बुहदा नदीकाठीच वसली आहेत हा इतिहास आहे. हळुहळु त्यांची संख्या वाढत गेली. सुपीक जमीन व पाणी शेतीसाठी पुरक वातावरण त्यामुळे लोकसंख्या वाढत गेली. लोक एकत्र गुण्यागोविंदाने राहू लागले. कालांतराने गावाला नाव प्राप्त झाले ‘दोनवडे’.
एकदा गाव वसले तर देव तेथे आलेच. पूर्वजांनी गावाबाहेर कौलारु रुपात मंदिर बांधले. दगडी पाषाणातील जोतिबाच्या मुर्तीची स्थापना केली. मंदिराचे बांधकाम पांडवकालीन शैली असलेले होते. हे मंदिर अत्यंत सुंदर होते. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला सवर्ण लोकांची बसण्याची व्यवस्था व डाव्या बाजूला इतर समाजातील जनतेची बसण्याची व्यवस्था बांधीव खोल्यात केली होती.
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील ‘दोनवडे’ हे गाव. पुरातन काळापासून ग्रामीण संस्कृती जपलेले गांव आहे. कोल्हापुर शहरापासून अगदी जवळ असूनसुद्धा एकोप्याने राहणारे, राजकीय, सहकार तसेच क्रिडाक्षेत्रात आपले नाव सतत उल्लेखनीय कामगिरीमुळे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यात देखील नावाजले जाते