सध्या गावातील ज्योतिर्लिंग देवालय व इतर धार्मिक स्थळांना सन २०२४/२५ मध्ये क वर्ग दर्जा प्राप्त झालेला आहे. ही गावासाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे.
कोल्हापूर शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेले दोनवडे गाव क्रीडा व सहकार क्षेत्रात नावाजलेले आहे. ग्रामदैवत श्री.केदारलिंगसह श्री.नरहरी, श्री.भावेश्वरी, श्री.महादेव, श्री.एकविरा, श्री.ब्रम्हदेव ब्रम्हनाथ, श्री.म्हसोबा, श्री.काशीदेव, श्री.भैरव अशी मंदिरे गावात आहेत. गावातील नवरात्र उत्सव परंपरा मोठी आहे. नवरात्र काळात येथील पाटील, कदम, पोवाळकर अशा मानाच्या सासनकाठ्या उत्सवात सहभागी असतात. दोनवडे गावाच्या मंदिराचे बांधकाम पांडवकालीन शैली असलेले होते.
ग्रामपंचायत दोनवडे
ग्रामपंचायत दोनवडे
भूत गल्लीमधील शिवजयंती म्हणजे हा एक मोठा सणच असतो,लहानापासून थोरापर्यंत सर्वजण या उत्साहामध्ये सहभागी होतात.
या उत्सवासाठी सर्व गल्लीमध्ये मुली रांगोळी काढतात त्यानंतर ठिकठिकाणी पारंपारिक वाद्य,ग्रंथ, मूर्ती टेबल वरती ठेवून त्याचे पूजन केले जाते, हा नजारा पाहून एक आध्यात्मिक आणि धार्मिक समाधान मिळून जाते, भव्य मंडप उभारला जातो त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते,सकाळी वारकरी संप्रदायाच्या सोबतीने भजनाच्या मदतीने छत्रपती शिवाजी महाराजांची पायी दिंडी काढली जाते. गल्लीतील तरुण तरुणी भजनामध्ये सहभागी झालेले असतात.दिंडी नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा कार्यक्रम होतो,राज्याभिषेक नंतर महिला वर्ग पारंपारिक वेशभूषा करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा म्हणण्याचा कार्यक्रम होतो, संध्याकाळी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते, तसेच सायंकाळी मोठ्या प्रमाणात मिरवणुकीची आयोजन केले जाते त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, जिजाऊ मासाहेब आणि मावळे अशा वेगवेगळ्या वेशभूषा करून घोड्यावरती बसून त्यांची मिरवणूक काढली जाते,मिरवणूक पारंपरिक पद्धतीने काढली जाते.
मिरवणूक नंतर शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती होते महाआरतीला सर्व स्त्रिया पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात, सर्व वातावरण शिवमय होऊन जाते
ग्रामपंचायत दोनवडे
राजकारण, सत्ता कारण, अर्थकारण, पद ,पैसा, प्रसिद्धी ,जात-पात, पक्ष-प्रांत , संघटना – मंडळ ,सुशिक्षित – अशिक्षित,गरीब-श्रीमंत , उच्च – नीच , लहान-मोठा असे सर्व भेदभाव लाथाडून देव देश धर्माच्या कार्यासाठी आणि श्री शिवशंभु रूपी रामराज्याच्या मागणीस व संपूर्ण हिंदू समाज भगव्याच्या छत्रछायेखाली एकत्र आणण्याचा उत्सव म्हणजे श्री दुर्गामाता दौड.
दुर्गा दोड दसऱ्यामध्ये नऊ दिवस पहाटे केली जाते,यामध्ये लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांचा सहभाग असतो लहान मुली महिला यांचा सहभाग अग्रस्थानी असतो.शिवगर्जना, शिवघोषणा आणि शिवकालीन गाणी म्हणत दुर्गा दौड काढली जाते.शुभ्र पांढरा पायजमा कुर्ता डोक्यावर भगवी टोपी कमरेला शेला असा दुर्गा दौड मध्ये सर्वांचा पेहरावा असतो.गावातील सर्वजण गट तट विसरून शिवमय होतात.
निद्रिस्त असलेला हिंदू समाज जागा करण्यासाठी व औरंगजेब रुपी डोके वर काढू पाहणाऱ्या हर एक मुघलास नेस्तनाभुत करण्यासाठी प्रत्येक धारकरी बांधवाने या दौडीत सहभागी झालेच पाहिजे.
ग्रामपंचायत दोनवडे
ग्रामपंचायत दोनवडे
ग्रामपंचायत दोनवडे
पूर्वीच्या पद्धतीन सुरू करून या विकास समितीने गावाचा एकोपा अबाधित ठेवण्याच्या तसेच कामाचा वारसा वाखाणले जाते. दरवर्षी दोन्ही तालीम मंडळांकडून श्रावण महिन्यात महाप्रसाद वाटप केले जाते. गावात ३० ते ३५ वर्षे अखंडीत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व महाप्रसाद चालू आहे. गावातील विविध संस्था, गावातील नागरिकांनी, माजी सरपंचानी आपापल्या कारकिर्दीत अत्यंत प्रामाणिकपणे चालवून नावारुपाला आणल्या आहेत. गेली १८ वर्षे अखंडीतपणे जपला आहे गावाचे वैशिष्ट्ध असे की, गावची लोकसंख्या कमी आहे पण एकूण कार्य मोठे आहे. तसेच स्वामी समर्थ मंडळाकडून गेली ११ वर्षे दत्त जयंतीला महाप्रसादाचे वाटप चालू आहे. खरे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराशेजारी गावातळे आहे. आजमितीस या तळ्यातील पाणी केंव्हाच आटलेले नाही. जोतिर्लिंग यात्रा कमिटीने मंदिराची रंगरंगोटीचे काम लोकवर्गणीतून पूर्ण केले आहे. आरतीचे गावकरी मानकरी : पाटील भावकी, मगदूम भावकी, चौगले भावकी आहेत.
सध्या गावातील ज्योतिर्लिंग देवालय व इतर धार्मिक स्थळांना सन २०२४/२५ मध्ये क वर्ग दर्जा प्राप्त झालेला आहे. ही गावासाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे.
ग्रामपंचायत दोनवडे
गावातील श्री जोतिर्लिंग मंदिर विकास समितीच्या माध्यमातून २००० सालापासून मंदिरामध्ये नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जाऊ लागला. दसऱ्याला सोने लुटण्याची पुर्वीची बंद पडलेली पद्धत, गावचा उरुस सुरू करण्याचे पूर्ण श्रेय या समितीला आहे. हे वास्तव म्हणजे सत्य नाकारता येत नाही.
वेगवेगळ्या खेड्यांना-शहरांना ओळख मिळते ती त्या ठिकाणी होऊन गेलेल्या थोरा-मोठ्यांमुळे नावलौकिक मिळविलेल्या माणसांमुळे. कधी कधी याच्या उलटही घडतांना दिसते. मात्र अशीही काही गावं असतात, ज्यांची ओळख त्या ठिकाणच्या माणसांमुळे तर असतेच, पण तेथील वृक्ष प्राणी पक्षांमुळेही असते. या गावांत पहिल्यांदाच जाणाऱ्यांच ते आकर्षण बनतात. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील ‘दोनवडे’ हे गाव. पुरातन काळापासून ग्रामीण संस्कृती जपलेले गांव आहे. कोल्हापुर शहरापासून अगदी जवळ असूनसुद्धा एकोप्याने राहणारे, राजकीय, सहकार तसेच क्रिडाक्षेत्रात आपले नाव सतत उल्लेखनीय कामगिरीमुळे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यात देखील नावाजले जाते. आता या गावाला ‘दोनवडे’ नाव का पडले? असा प्रश्न उभा राहतो आणि सुरवातीस म्हटल्याप्रमाणे गावाचे नांव कसे पडते याचा उहापोह झाला आहेच तर दोनवडे हे नांव ‘दोन वडाच्या म्हणजे गावात असणाऱ्या प्राचीन वट वृक्षावरून म्हणजे वडाच्या झाडावरून पडले आहे असे गावातील वृद्ध मंडळी सांगतात.
ग्रामपंचायत दोनवडे
ग्रामपंचायत दोनवडे
ग्रामपंचायत दोनवडे
पूर्वीच्या पद्धतीन सुरू करून या विकास समितीने गावाचा एकोपा अबाधित ठेवण्याच्या तसेच कामाचा वारसा वाखाणले जाते. दरवर्षी दोन्ही तालीम मंडळांकडून श्रावण महिन्यात महाप्रसाद वाटप केले जाते. गावात ३० ते ३५ वर्षे अखंडीत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व महाप्रसाद चालू आहे. गावातील विविध संस्था, गावातील नागरिकांनी, माजी सरपंचानी आपापल्या कारकिर्दीत अत्यंत प्रामाणिकपणे चालवून नावारुपाला आणल्या आहेत. गेली १८ वर्षे अखंडीतपणे जपला आहे गावाचे वैशिष्ट्ध असे की, गावची लोकसंख्या कमी आहे पण एकूण कार्य मोठे आहे. तसेच स्वामी समर्थ मंडळाकडून गेली ११ वर्षे दत्त जयंतीला महाप्रसादाचे वाटप चालू आहे. खरे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराशेजारी गावातळे आहे. आजमितीस या तळ्यातील पाणी केंव्हाच आटलेले नाही. जोतिर्लिंग यात्रा कमिटीने मंदिराची रंगरंगोटीचे काम लोकवर्गणीतून पूर्ण केले आहे. आरतीचे गावकरी मानकरी : पाटील भावकी, मगदूम भावकी, चौगले भावकी आहेत.
सध्या गावातील ज्योतिर्लिंग देवालय व इतर धार्मिक स्थळांना सन २०२४/२५ मध्ये क वर्ग दर्जा प्राप्त झालेला आहे. ही गावासाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे.
ग्रामपंचायत दोनवडे
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन अशा पन्हाळा ते पावनखिंड या ऐतिहासिक, रक्तरंजित पायी पदभ्रमंती मोहिमेस झालेली सुरुवात संपूर्ण महाराष्ट्राला एक प्रेरणा देणारी पद भ्रमंती आहे. आपल्या दोनवडे गावातून रामदास महादेव पाटील यांनी १९९९ साली प्रथम सहभाग घेतला. हळूहळू गावातून अठरा पगड जातीचे लोक या मोहिमेत सहभागी होऊ लागले. या मोहिमेला पूर्णत्व देण्यासाठी गणेश जाधव, राजू यादव, रामदास शिंदे, सुशील शिंदे, रवी पोवाळकर, अमोल नगारे, सतेज पाटील, केदार गुरव, साई पाटील, निलेश पाटील अशा लोकांनी निस्वार्थ भावनेने सहभाग घेत आहेत. आज आपल्या गावातून उच्चांकी 51 लोक या मोहिमेत सहभागी होत आहेत यामध्ये जवळजवळ 18-20 रणरागिणी सहभागी होत आहेत ही खरंच एक अभिमानाची गोष्ट आहे. ही एक धारकऱ्यांची वारीच म्हणावी लागेल. अशा या ऐतिहासिक आणि गौरवशाली मोहिमेला माझ्या नतमस्तक शुभेच्छा…. जय शिवराय
ग्रामपंचायत दोनवडे