दोनवडे

Donawade Logo

ग्रामपंचायत दोनवडे

तालुका - करवीर , जिल्हा - कोल्हापूर

ग्रामपंचायत दोनवडे

शरीर सौष्ठव.

मर्दानी खेळ फेकणे या क्रीडा प्रकारामुळे गावाचे नाव महाराष्ट्रात गाजले.

शरीर सौष्ठव

गावातली जीम मध्ये व्यायाम करून काही तरुणांनी नॅशनल पर्यंत गोल्ड मेडल संपादन केले आहे.व्यायाम करून काही तरुणांनी नॅशनल पर्यंत गोल्ड मेडल संपादन केले आहे.व्यायाम शाळेचे अत्याधुनिक मशिनरी सहित नूतनीकरण केले आहे.

देव गल्ली आणि भूत गल्ली यांच्या मधोमध असलेली पचिंद्रे जिम

सुनील बाजीराव मगदूम

‘तुझ्यात जीव रंगला ‘ मालिकेतील अभिनेता हार्दिक म्हणजे राणादा यांचा फिटनेस ट्रेनर म्हणून कार्यरत होते.

  • 2015 – हैद्राबाद ज्युनिअर – नॅशनल गोल्ड
  • 2016 – पुणे सिनिअर – नॅशनल गोल्ड
  • 2017 – न्यू दिल्ली सिनिअर –  नॅशनल गोल्ड
  • 2018/19 – रायपूर सिनिअर –  नॅशनल 3rd
  • 2023 – पुणे बालेवाडी पोस्ट ऑफीस – 1st place
  • 2023 – दिल्ली ऑल इंडिया सिव्हिल – 3rd place

सुनील बाजीराव मगदूम

9356592815

सर्जेराव बाळासो पाटील

9158971110

देव गल्ली आणि भूत गल्ली यांच्या मधोमध असलेली पचिंद्रे जिम

सर्जेराव बाळासो पाटील

मी सर्जेराव बाळासो पाटील मला बॉडीबिल्डीग ची आवड 1999 पासून होती. मी आमच्या गावातली जीम मध्ये दोन वर्षे व्यायाम केला, त्या नंतर मी पहिली बॉडी बिल्डिंग स्पर्धा कोल्हापूर येथे खेळलो, तेथे मला दुसरा क्रमांक मिळाला. त्या नंतर मला गावातील लोकांचा फार मोठा सपोट मिळाला.

नंतर मी 2003 ला कोल्हापूर येथे बिभीषण पाटील जीम ला जाऊ लागलो तेथे मला राजेश वडाम सर यांचे मार्गदर्शन लाभले. माझी आर्थिक स्थिती चांगली नव्हती मला माझ्या घरच्यांनी खुप मदत केली, आमचे बंधू नागेश पाटील यांनी मला खूप मदत केली त्या नंतर मी 2004 ते 2011 पर्यंत खूप स्पर्धा खेळलो. त्या मध्ये कोल्हापूर श्री. महाराष्ट्र श्री .भारत श्री. पारितोषिक मिळाली.

मी आता बालिगे येथे S.S.GYM चालवतो आणि इतर मुलांना मार्गदर्शन करतो.