आर आर पाटील स्मार्ट ग्राम स्पर्धेमध्ये ग्रामपंचायत दोनवडे ने सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये आपल्या गावचा प्रथम क्रमांक घोषित झालेबद्दल मा.आमदार श्री.चंद्रदीप नरके यांचे हस्ते सत्कार स्वीकारताना सरपंच श्री.सर्जेराव शिंदे, उपसरपंच सौ.वैशाली कांबळे सर्व सदस्य व ग्रामपंचायत अधिकारी गायत्री जाखलेकर मॅडम
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत 17 सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या ग्रामसभेत अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच या स्पर्धेमध्ये सर्वांनी लोक सहभाग घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धे अंतर्गत पाण्याची टाकी परिसरात साफसफाई आणि वृक्षारोपण, रंगरंगोटी करण्यात आली
"करवीर तालुका गणराया अवॉर्ड" आपल्या गावच्या महादेव तालीम मंडळ ह्यांना जवळ पास 1100 मंडळाचा समावेश असताना 4 था क्रमांक तसेच आदर्श मंडळ करवीर तालुका पुरस्कार प्राप्त झाला
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेमध्ये सहभाग घेतला असून याबाबत विद्या मंदिर दोनवडे शाळा, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र यांना भेटी देऊन मार्गदर्शक सूचना देताना लोकनियुक्त सरपंच श्री.सर्जेराव शिंदे, ग्रामपंचायत अधिकारी गायत्री जाखलेकर मॅडम
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत दिनांक 10 ऑक्टोबर रोजी विशेष शैक्षणिक ग्रामसभा विद्या मंदिर दोनवडे शाळेत पार पडली