गांवातील लोकसंख्या,शेती आणि भौगोलिक परिस्थितीची सविस्तर माहिती









गावाला कायमस्वरूपी पाणी असणारी भोगावती नदी लाभली आहे. त्यामुळें पिण्यासाठी आणि शेतीसाठी भरपूर प्रमाणात पाणी मिळते.
दोनवडे गावामध्ये पावसाळ्यामध्ये पूर परिस्थिती खुप मोठ्या प्रमाणात येते, कोल्हापूर गगनबावडा रोड वर दोनवडे पुलाजवळ रत्यावर पाणी येऊन वाहतूक बंद होतें.तसेच गावामध्ये देवगल्ली व भूत गल्ली या दोन्ही गल्लीमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होते.
शेतीचा 60 ते 70% भाग पुराच्या पाण्याखाली जतो त्यामुळें शेतीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
दरवषी पावसाळा सुरू झाला की गावातील लोकांच्या मनात पुराची भीती वाटते.