दोनवडे

Donawade Logo

ग्रामपंचायत दोनवडे

तालुका - करवीर , जिल्हा - कोल्हापूर

ग्रामपंचायत दोनवडे

आमच्या विषयी.

कोल्हापूर शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेले दोनवडे गाव क्रीडा व सहकार क्षेत्रात नावाजलेले आहे.

ग्रामपंचायत दोनवडे

सध्या गावातील ज्योतिर्लिंग देवालय व इतर धार्मिक स्थळांना सन २०२४/२५ मध्ये क वर्ग दर्जा प्राप्त झालेला आहे. ही गावासाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे.

माझं गांव माझं मंदिर

आपला भारत देश आंतरराष्ट्रीय पातळीवर तरुणांची संख्या जास्त असलेला देश म्हणून ओळखला जातो, तशी वृद्ध मंडळीही आपला इतिहास सांगतांना म्हणतात, की या ‘दोनवडे’ गावात राहणारे वंशज हे मुंगीपैठण येथील देशमुख-पाटील घराण्यातील आहेत. पुरातन काळी त्यांच्या वंशजांनी मुंगीपैठण येथे त्यांच्याकडील हत्ती मारला व त्याच्याबरोबर वाद झाल्याने आणि त्यामुळे त्यांना गांव सोडावे लागला. हे सर्व लोक मजल दरमजल करीत त्यापैकी काही लोक भोगावती नदीकाठी स्थिरावले व त्यांनी आपली वस्ती उभारली. पुरातन कांही गावे, शहरे ही बुहदा नदीकाठीच वसली आहेत हा इतिहास आहे. हळुहळु त्यांची संख्या वाढत गेली. सुपीक जमीन व पाणी शेतीसाठी पुरक वातावरण त्यामुळे लोकसंख्या वाढत गेली. लोक एकत्र गुण्यागोविंदाने राहू लागले. कालांतराने गावाला नाव प्राप्त झाले ‘दोनवडे’.

कोल्हापूर शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेले दोनवडे गाव क्रीडा व सहकार क्षेत्रात नावाजलेले आहे. ग्रामदैवत श्री.केदारलिंगसह श्री.नरहरी, श्री.भावेश्वरी, श्री.महादेव, श्री.एकविरा, श्री.ब्रम्हदेव ब्रम्हनाथ, श्री.म्हसोबा, श्री.काशीदेव, श्री.भैरव अशी मंदिरे गावात आहेत. गावातील नवरात्र उत्सव परंपरा मोठी आहे. नवरात्र काळात येथील पाटील, कदम, पोवाळकर अशा मानाच्या सासनकाठ्या उत्सवात सहभागी असतात. दोनवडे गावाचे नाव दोन वडाच्या झाडांवरून पडले आहे. दोनवडे गावाच्या मंदिराचे बांधकाम पांडवकालीन शैली असलेले होते. दोन्ही बाजूंना आसनव्यवस्था होती. नंतर वर चढून गेल्यावर हॉल होता. लाकडी खांबावर भार पेललेले मंदिर होते. मुख्य मंदिराच्या मागे चिंचेचे मोठे झाड होते. मंदिराच्या बाजूला गणपती व हनुमान यांची छोटी मंदिरे आहेत. शेजारी चाफ्याचे खूप जुने झाड आहे. 

वेगवेगळ्या खेड्यांना-शहरांना ओळख मिळते ती त्या ठिकाणी होऊन गेलेल्या थोरा-मोठ्यांमुळे नावलौकिक मिळविलेल्या माणसांमुळे. कधी कधी याच्या उलटही घडतांना दिसते. मात्र अशीही काही गावं असतात, ज्यांची ओळख त्या ठिकाणच्या माणसांमुळे तर असतेच, पण तेथील वृक्ष प्राणी पक्षांमुळेही असते. या गावांत पहिल्यांदाच जाणाऱ्यांच ते आकर्षण बनतात. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील ‘दोनवडे’ हे गाव. पुरातन काळापासून ग्रामीण संस्कृती जपलेले गांव आहे. कोल्हापुर शहरापासून अगदी जवळ असूनसुद्धा एकोप्याने राहणारे, राजकीय, सहकार तसेच क्रिडाक्षेत्रात आपले नाव सतत उल्लेखनीय कामगिरीमुळे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यात देखील नावाजले जाते. 

एकदा गाव वसले तर देव तेथे आलेच. पूर्वजांनी गावाबाहेर कौलारु रुपात मंदिर बांधले. दगडी पाषाणातील जोतिबाच्या मुर्तीची स्थापना केली. मंदिराचे बांधकाम पांडवकालीन शैली असलेले होते. हे मंदिर अत्यंत सुंदर होते. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला सवर्ण लोकांची बसण्याची व्यवस्था व डाव्या बाजूला इतर समाजातील जनतेची बसण्याची व्यवस्था बांधीव खोल्यात केली होती.

जुन्या मंदिराच्या समोरील दीपमाळेखालील दगडावर हे बांधकाम १८९२ साली पूर्ण झाल्याचा एक शिलालेख होता. तो सध्या रस्त्याच्या खाली गेला आहे. साधारणपणे प्रत्येक २० ते २५ वर्षानंतर मंदिराचा जिर्णोद्धार होत गेल्याच्या खुणा आपल्याला पहायला मिळतात. गावातील सर्व लहानथोर ग्रामस्थांनी आपापल्या परीने मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी श्रमदान, धनदान इत्यादी माध्यमातून भरीव मदत केली आहे. गावातील महादेव तालीम मंडळ व हनुमान तालीम मंडळ यांनी गावचे नांव कुस्ती, दांडपट्टा, झांजपथक, लेझीम पथक इत्यादी क्षेत्रात उज्ज्वल केले आहे. त्यामुळे करवीर तालुक्यातच नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यात ‘दोनवडे’ गावाचे नाव एक आदर्श गाव म्हणून ओळखलं जातं.

          सध्या गावातील ज्योतिर्लिंग देवालय व इतर धार्मिक स्थळांना सन २०२४/२५ मध्ये क वर्ग दर्जा प्राप्त झालेला आहे. ही गावासाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे.

ग्रामपंचायत दोनवडे

श्री.जोतिर्लिंग मंदिर

ग्रामदैवत श्री.केदारलिंगसह श्री.नरहरी, श्री.भावेश्वरी, श्री.महादेव, श्री.एकविरा, श्री.ब्रम्हदेव ब्रम्हनाथ, श्री.म्हसोबा, श्री.काशीदेव, श्री.भैरव अशी मंदिरे गावात आहेत. गावातील नवरात्र उत्सव परंपरा मोठी आहे. नवरात्र काळात येथील पाटील, कदम, पोवाळकर अशा मानाच्या सासनकाठ्या उत्सवात सहभागी असतात.

श्री जोतिर्लिंग मंदिर विकास समितीच्या माध्यमातून २००० सालापासून मंदिरामध्ये नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जाऊ लागला. दसऱ्याला सोने लुटण्याची पुर्वीची बंद पडलेली पद्धत, गावचा उरुस सुरू करण्याचे पूर्ण श्रेय या समितीला आहे. हे वास्तव म्हणजे सत्य नाकारता येत नाही. पूर्वीच्या पद्धतीन सुरू करून या विकास समितीने गावाचा एकोपा अबाधित ठेवण्याच्या तसेच कामाचा वारसा वाखाणले जाते. दरवर्षी दोन्ही तालीम मंडळांकडून श्रावण महिन्यात महाप्रसाद वाटप केले जाते. गावात ३० ते ३५ वर्षे अखंडीत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व महाप्रसाद चालू आहे.

दोनवडे गावाच्या मंदिराचे बांधकाम पांडवकालीन शैली असलेले होते. दोन्ही बाजूंना आसनव्यवस्था होती. नंतर वर चढून गेल्यावर हॉल होता. लाकडी खांबावर भार पेललेले मंदिर होते. मुख्य मंदिराच्या मागे चिंचेचे मोठे झाड होते. मंदिराच्या बाजूला गणपती व हनुमान यांची छोटी मंदिरे आहेत. शेजारी चाफ्याचे खूप जुने झाड आहे. पूर्वीच्या काळी प्रत्येक सणाला मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम चालत असत. जुन्या मंदिराच्या समोर दीपमाळ आणि खालील दगडावर हे बांधकाम १८९२ मध्ये पुर्ण झाल्याचा एक शिलालेख होते. तो सध्या रस्त्याची उंची वाढल्यामुळे खाली गेला आहे. त्यानंतर वीस ते पंचवीस वर्षांनी मंदिराचा जीर्णोद्धार झाला.पाटील भावकी, कदम भावकी, चौगले भावकी असे बारा बलुतेदार पालखीचे मानकरी असतात. दरवर्षी गावात अक्षयतृतीया नंतर मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. गावातील ग्रामस्थ मंदिरात येऊन विविध कार्यक्रम, पुजा करतात.

स्वामी समर्थ मंडळाकडून गेली ११ वर्षे दत्त जयंतीला महाप्रसादाचे वाटप चालू आहे. खरे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराशेजारी गावातळे आहे. आजमितीस या तळ्यातील पाणी केंव्हाच आटलेले नाही. जोतिर्लिंग यात्रा कमिटीने मंदिराची रंगरंगोटीचे काम लोकवर्गणीतून पूर्ण केले आहे. आरतीचे गावकरी मानकरी : पाटील भावकी, मगदूम भावकी, चौगले भावकी आहेत.

          सध्या गावातील ज्योतिर्लिंग देवालय व इतर धार्मिक स्थळांना सन २०२४/२५ मध्ये क वर्ग दर्जा प्राप्त झालेला आहे. ही गावासाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे.

पुर्वीचे श्री.जोतिर्लिंग मंदिर 

आताचे श्री.जोतिर्लिंग मंदिर 

ग्रामपंचायत दोनवडे

श्री.महादेव मंदिर

पुर्वी मुख्य गाव हे देव गल्ली व भुत गल्ली या दोन गल्लीपुरते मर्यादीत होतें त्यामुळें या दोन गल्लीच्या मधे महादेन मंदिराची स्थापना केली.मंदिरामधील शिवलिंग हे काळ्या दगडी पाषाणातून बनवून बाहेरून आणले आहे.या मंदिराची स्थापना लोकवर्गणीतून केली आहे.या मंदिरानंतर ज्योतिर्लिंग मंदिराची स्थापना झाली.

ग्रामदैवत श्री.केदारलिंगसह श्री.नरहरी, श्री.भावेश्वरी, श्री.महादेव, श्री.एकविरा, श्री.ब्रम्हदेव ब्रम्हनाथ, श्री.म्हसोबा, श्री.काशीदेव, श्री.भैरव अशी मंदिरे गावात आहेत. गावातील नवरात्र उत्सव परंपरा मोठी आहे. नवरात्र काळात येथील पाटील, कदम, पोवाळकर अशा मानाच्या सासनकाठ्या उत्सवात सहभागी असतात.

पूर्वीच्या पद्धतीन सुरू करून या विकास समितीने गावाचा एकोपा अबाधित ठेवण्याच्या तसेच कामाचा वारसा वाखाणले जाते. दरवर्षी दोन्ही तालीम मंडळांकडून श्रावण महिन्यात महाप्रसाद वाटप केले जाते. गावात ३० ते ३५ वर्षे अखंडीत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व महाप्रसाद चालू आहे.

          सध्या गावातील ज्योतिर्लिंग देवालय व इतर धार्मिक स्थळांना सन २०२४/२५ मध्ये क वर्ग दर्जा प्राप्त झालेला आहे. ही गावासाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे.

ग्रामपंचायत दोनवडे

श्री.थळपांढरी मंदिर

स्थळ पांढर हे पूर्वजांनी गाव वसताना गावाचे रक्षण करण्यासाठी म्हणजे गावाच्या स्थळाचे रक्षण करण्यासाठी उभारलेले पहिले मंदिर होय. त्यानंतर इतर मंदिराची स्थापना झाली. गावातील लोक दसऱ्या मध्ये व गावाच्या जत्रेवेली आवर्जून नैवद्य देतात, तसेच लग्न समारंभाच्या वेळी देखील आवर्जून दर्शन घेतले जाते.

ग्रामदैवत श्री.केदारलिंगसह श्री.नरहरी, श्री.भावेश्वरी, श्री.महादेव, श्री.एकविरा, श्री.ब्रम्हदेव ब्रम्हनाथ, श्री.म्हसोबा, श्री.काशीदेव, श्री.भैरव अशी मंदिरे गावात आहेत. गावातील नवरात्र उत्सव परंपरा मोठी आहे. नवरात्र काळात येथील पाटील, कदम, पोवाळकर अशा मानाच्या सासनकाठ्या उत्सवात सहभागी असतात.

          सध्या गावातील ज्योतिर्लिंग देवालय व इतर धार्मिक स्थळांना सन २०२४/२५ मध्ये क वर्ग दर्जा प्राप्त झालेला आहे. ही गावासाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे.

ग्रामपंचायत दोनवडे

श्री.ब्रह्मदेव मंदिर

ग्रामदैवत श्री.केदारलिंगसह श्री.नरहरी, श्री.भावेश्वरी, श्री.महादेव, श्री.एकविरा, श्री.ब्रम्हदेव ब्रम्हनाथ, श्री.म्हसोबा, श्री.काशीदेव, श्री.भैरव अशी मंदिरे गावात आहेत. गावातील नवरात्र उत्सव परंपरा मोठी आहे. नवरात्र काळात येथील पाटील, कदम, पोवाळकर अशा मानाच्या सासनकाठ्या उत्सवात सहभागी असतात.

श्री जोतिर्लिंग मंदिर विकास समितीच्या माध्यमातून २००० सालापासून मंदिरामध्ये नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जाऊ लागला. दसऱ्याला सोने लुटण्याची पुर्वीची बंद पडलेली पद्धत, गावचा उरुस सुरू करण्याचे पूर्ण श्रेय या समितीला आहे. हे वास्तव म्हणजे सत्य नाकारता येत नाही. पूर्वीच्या पद्धतीन सुरू करून या विकास समितीने गावाचा एकोपा अबाधित ठेवण्याच्या तसेच कामाचा वारसा वाखाणले जाते. दरवर्षी दोन्ही तालीम मंडळांकडून श्रावण महिन्यात महाप्रसाद वाटप केले जाते. गावात ३० ते ३५ वर्षे अखंडीत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व महाप्रसाद चालू आहे.

          सध्या गावातील ज्योतिर्लिंग देवालय व इतर धार्मिक स्थळांना सन २०२४/२५ मध्ये क वर्ग दर्जा प्राप्त झालेला आहे. ही गावासाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे.

ग्रामपंचायत दोनवडे

श्री.एकविरा देवी मंदिर