कार्यकाल – सन २०२३ ते २०२८
माननिय लोकनियुक्त
ग्रामपंचायत दोनवडे
कार्यकाल – सन २०२३ ते २०२८
कैआबासाहेब शिंदे यांचे सुपुत्र श्री.सर्जेराव आबासाहेब शिंदे आपल्या वडीलाप्रमाने राजकारणामध्ये अग्रेसर आहेत. यांच्या माध्यमातून 2023 साली दोनवडे गावाला लोकनियुक्त सरपंच म्हणून अधुनिक दृष्टीकोन ठेवणारे, निर्व्यसनी, सुशिक्षित असे एक युवा नेतृत्व लाभले.
त्यामुळें गावात मोठ्या प्रमाणात विकास कामे घडून आली आहेत. गावांसाठी विकासनिधी खेचून आणण्यामध्ये त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. ते स्वतः सिव्हिल इंजिनिअर आहेत त्यामुळे विकासकामे स्वतःच्या देखरेखीखाली चांगल्या पद्धतीने करून घेतात. हायटेक ग्रामपंचायत इमारत, वटवृक्षाचे संवर्धन, ज्योतिर्लिंग मंदिराला “क” वर्ग दर्जा प्राप्त मिळवला. अशी अनेक विकासकामे केली आहेत आणि करत आहेत.
आताच्या डिजिटल युगात अग्रेसर राहण्यासाठी तसेच लोकांना गावातील सर्व माहिती मोबाईल वर पाहता यावी यासाठी “www.grampanchayatdonawade.com” ह्या वेबसाईट ची निर्मिती केली.
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील ‘दोनवडे’ हे गाव. पुरातन काळापासून ग्रामीण संस्कृती जपलेले गांव आहे. कोल्हापुर शहरापासून अगदी जवळ असूनसुद्धा एकोप्याने राहणारे, राजकीय, सहकार तसेच क्रिडाक्षेत्रात आपले नाव सतत उल्लेखनीय कामगिरीमुळे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यात देखील नावाजले जाते