ग्रामपंचायत दोनवडे
राजकीय क्षेत्र विषयी.
राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्यात आपले नाव नावाजले
ग्रामपंचायत दोनवडे
दोनवडे हे एक वैशिष्ट्यपूर्ण करवीर नगरीतील गाव आहे ज्या गावाला समृद्ध असा कुस्ती, कला, परंपरेचा वारसा लाभलेला आहे गावाला अनेक ऐतिहासिक संदर्भ आहेत याच गावच्या मातीमध्ये उत्तुंग यश मिळवणारी सामाजिक राजकीय क्षेत्रातील माणसं इथे निर्माण झाली ज्यांच्या कामामुळे गावच्या विकासामध्ये भर पडली
आतापर्यंत कुंभीं कासारी साखर कारखाना, करवीर पंचायत समिती, रयत कृषी संघ, इरिगेशनचे फेडरेशन आदी तालुका पातळीवरील संस्था मध्ये गावाने आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवला आहे.
सहकारी व सामाजिक कार्याचे शिरोमणी
आद्य प्रवतक कुंभी कासारी सह साखर कारखाना कुडित्रे.
तात्यांनी कधीही पदाचा लोभ झाला नाही, कुणीतरी आपला गौरव करावा अशी त्यांची वृत्ती नव्हती तरी आयुष्याच्या या दीर्घ प्रवासातील त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना भारत सरकार कडून ऑनररी मॅझिस स्टेट ही पदवी देऊन गौरवण्यात आले श्री बोंद्रे दादा शी घट्ट संबंध असलेने तालुका रयत खरेदी-विक्री संघ स्थापन केला या संघाची चेअरमनपदाची धुरा सलग पंधरा वर्षे तात्यांनी सांभाळले
कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचे आद्य प्रवर्तक डी सी नरके यांच्या खांद्याला खांदा लावून कारखाना स्थापन करण्यामध्ये पुढाकार घेतला. कारखाना सुरू करत असताना गावो गावी पायी आणि सायकल फिरून शेअर्स गोळा केले यातूनच तात्यांना प्रवर्तकांच्या पंगती मध्ये बसण्याचा मान मिळाला
यानंतर त्यांनी गावामध्ये विविध विकास कार्यकारी सहकारी संस्था स्थापन केल्या राजकीय विरोध होऊ लागल्यामुळे त्यांनी केदारनाथ सहकारी संस्था स्थापना केली यातूनच पुढे केदारलिंग दूध संस्था स्थापना केली दोनवडे गावातील सहकाराचे आद्य शिरोमणी कै रामचंद्र गुरव तात्या यांना म्हणायला काही हरकत नाही.
कै. रामचंद्र गुरव तात्या
ग्रामपंचायत दोनवडे
सुनिता महादेव पोवाळकर
ग्रामपंचायत दोनवडे
माजी उपसभापती
करवीर पंचायत समिती
माजी सदस्य
करवीर पंचायत समिती
शारदा बंडू कदम माजी पंचायत समिती सदस्य वर्ष 1993 ते 1998
सौ.शारदा बंडू कदम
ग्रामपंचायत दोनवडे
श्री चिंतामण रामचंद्र गुरव
ग्रामपंचायत दोनवडे
माजी चेअरमन
रयत सेवा कृषी उद्योग सहकारी संघ मर्यादीत कोल्हापूर
श्री केदरलिंग सहकारी दुध व्याव. संस्था मर्यादित दोनवडे या दुध डेअरी रीची स्थापना 23/8/1978 रोजी केली.
1985-90 दरम्यान कुंभी कासारी सहकारी बँक कुदीत्रे येथे संचालक म्हणून नियुक्ती झाली.
श्री केदारनाथ कृषी संस्था दोनावडे मार्फत सहकारी रयत सेवा कृषी उद्योग सकररी संघ मर्यादीत कोल्हापूर येथे 23/8/2004 ते 2009 साली चेअरमन झाले.
महात्मा फुले ग्राहक सहकारी संस्था मर्यादित बलिंगा येथे चेअरमन पदी नियुक्ती झाली.
माजी संचालक
कुंभी कासारी सह. साखर कारखाना कुदित्रे
श्री. सदाशिव गणपती पाटील (बापू) हे गावातील रुबाबदार व्यक्तिमत्व होते, त्यांनी श्री कामधेनु सह.दुध व्यावसायिक संस्थेची 1972 साली स्थापना केली.
त्यांनी कुंभी कासारी सह साखर कारखाना लि. कुडीत्रे येथे संचालक म्हणून कार्य केले होते. त्यांना लोक बापू म्हणून संबोधत होते.
श्री. सदाशिव गणपती पाटील (बापू)
ग्रामपंचायत दोनवडे